लस्सी-Lassi

Read this recipe in English 
सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
१ १/२ कप जाडसर थंड दही
१/२ कप ताजी जाड मलई (फ्रेश क्रीम)
१/४-१/२ टीस्पून मीठ
साखर चवीप्रमाणे (अंदाजे १/४ कप)
सजावटीसाठी पुदिन्याची पाने

कृती:
१. दही,मलई,साखर आणि मीठ एकत्र करून ब्लेंडर वर छान घुसळून घ्या.
२. लस्सी सर्व्हिंग ग्लास मध्ये फुटभर उंचीवरून ओता म्हणजे वरती मस्त जाड फेस तयार होईल.
३. त्यावर पुदिन्याची पाने घालून तासभर फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.ग्लासमध्ये लस्सीवर चमचाभर मलई घातली तरी झक्कास लागतं!

टीप: लस्सी जाडच चांगली लागते पण किंचित पात्तळ करायची असेल तर थोडेसे गार पाणी घालून ब्लेंडरवर घुसळून घ्या.

5 comments:

  1. शुक्रवारी माझ्या अड्ड्यावर जाणार आणि लस्सी खाणार... मला लस्सी प्यायला आवडत नाही.. खायला लागावी इतकी जाड असावीच लागते... :)

    ReplyDelete
  2. Rohan,
    maza navra sangat hota..ki thanyala kunjvihar ani tiptopchi lassi 'lai bhari aste' tu kuthe janar?

    and you are right.. lassi jadach chan lagte..ekdum malaidar!! Yummy!!

    ReplyDelete
  3. thoda ruhaafja ani 2 themb gulaab esense ani takun bagha, anikch testy hoil,

    ReplyDelete
  4. thanks Mukul for a nice tip...me nakki try karin.

    ReplyDelete
  5. kaal mith takal tar chalel ka?

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!