पनीर बटर मसाला-Paneer Butter Masala

Read this recipe in English 
सर्व्हिंग:
२ ते ३ माणसांसाठी

साहित्य: 
१७५ ग्रॅम पनीर
२ मध्यम कांदे,बारीक चिरून
१/२" आलं+ ३-४ मध्यम लसूण- यांची पेस्ट
५-६ तळलेले काजू
३ टोमॅटोची जाड प्युरी
१/२ टीस्पून गरम मसाला
१ १/४ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरे पूड
१ टीस्पून लाल तिखट (बेडगी)
१ टीस्पून हळद
१ टीस्पून कसुरी मेथी, चुरडून
१/४ कप जाडसर क्रीम
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
३-4 टेबलस्पून बटर

कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करून बटरवर शालो फ्राय करून घ्या.
२. टोमॅटोची जाड प्युरी करून ठेवा. आलं-लसूण पेस्ट करून घ्या.
३. कढईत २ टेबलस्पून बटर गरम करा. त्यातच १ चमचा तेल घाला. मग आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परता. नंतर कांदा घालून शिजेपर्यंत परता.
४. कांदा शिजला कि, त्यात हळद,तिखट,गरम मसाला,धने-जिरे पूड आणि किंचित मीठ घालून छान वास सुटे पर्यंत परतून घ्या. गॅस बंद करा.
५. हे सगळे मिश्रण आणि तळलेले काजू एकत्र करून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास पाणी न घालता थोडीशी टोमॅटो प्युरी घालून वाटा.
६. आता पुन्हा कढईत १ टेबलस्पून बटर गरम करा आणि वाटलेला कांदा आणि काजूची पेस्ट घालून २-३ मिनिटे परता.
७. मग टोमॅटो प्युरी,मीठ आणि साखर  घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवून ८-१० मिनिटे ग्रेवी  शिजवत ठेवा. कसुरी मेथी घाला आणि गॅस बंद करा.
८. पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.झाकण ठेवून ५-७ मिनिटांनी वरून क्रीम घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा.
९.  वरून कोथिंबीर किंवा पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि रोटी किंवा नान बरोबर सर्व्ह करा.

13 comments:

  1. करुन पहावयास हरकत नाही.

    मला तुम्हाला असे विचारवयाचे आहे की माझी मिसेस जेंव्हा घरी ढोकळा बनवते तेंव्हा तो बाजारातल्या सारखा हलका का होत नाही?

    क्रुती सांगीतली तर बरे होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. kruti --- sodiyam karbonet taka khayach soda

      Delete
  2. नमस्कार सुधीर,
    पनीर बटर मसाला नक्की करून बघा..
    मी ढोकळ्याची रेसिपी लवकरात लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करीन. ढोकळा हलका आणि स्पोन्जी होण्यासाठी मिश्रणात त्यात बेकिंग सोडा (खायचा सोडा)किंवा इनो फ्रुट सॉल्ट याचे प्रमाण योग्य पडणे आवश्यक असते. मिश्रण फरमेंट झाल्यावर मगच ढोकळा करावा म्हणजे ढोकळा छान हलका होईल.सोडा मिश्रणात ढोकळा करायच्या वेळेसच मिक्स करावा.

    ReplyDelete
  3. नमस्कार,
    मी तुमच्या ब्लॉग्जची नियमित वाचक आहे. तुम्ही दिलेल्या रेसिपी सोप्या आणि सहज करता येणाऱयासारख्या असतात. त्याबद्दल धन्यवाद.
    एक प्रश्न- वरील पनीर बटरच्या कृतीप्रमाणे ग्रेव्ही करुन घेऊन चिकन बटर मसाला बनवता येईल का? कृपया मार्गदर्शन करा.

    ReplyDelete
  4. नमस्कार कीर्ती,
    कमेंटसाठी धन्यवाद!!
    वरील कृती प्रमाणे तुम्हाला चिकन बटर मसाला करता येईल.पण त्यासाठी चिकनला आलं-लसूण,मीठ,हळद-तिखट,धने-जिरेपूड आणि लिंबुरस लावून तासभर मॅरीनेट करून ठेवावे लागेल. नंतर बटरवर शालो फ्राय करून,पूर्णपणे शिजवून नंतर ग्रेवी मध्ये घालावे लागेल.ओव्हन असेल तर ३५० F तापमानाला ओव्हन मध्ये शिजवून घेतलं तर उत्तम!

    ReplyDelete
  5. धन्यवाद कल्याणी, नक्की करुन पाहते आणि कळवते कसं होतंय ते!

    ReplyDelete
  6. mala khup avdle paneer batar masala ani priti la bnvala singitle

    ReplyDelete
  7. Replies
    1. ajparyantachi best receipe aahe hi paneer butter masalachi. dhanyawad

      Delete
  8. tumcha method khupch easy ahe, mi atach karun bhaghte.

    ReplyDelete
  9. hi kalyani,tumchya sarvach RCP khup Chhan aahet..pan mala butter chiken chi RCP milel ka? please....

    Thanks
    Aparna

    ReplyDelete
  10. Awesome recipe! Turned out delicious.. I have a question regarding bhajani. How do you grind the grains and pulses? I have a food processor but will not be able to grind wheat using that.. Any alternative?

    ReplyDelete
  11. thank you for recipe

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!