तांदूळ आणि पोह्याचे मिक्स पोळे- Rice and Pohe Mix Dosa



सर्व्हिंग: २-३ माणसांना पुरतील इतके ६-७ मध्यम पोळे

साहित्य:
१/२ कप तांदूळ
१/२ कप जाडे पोहे
१/४ कप निवडलेली  कोथिंबीर
१/४ टीस्पून मेथीदाणे
२ हिरव्या मिरच्या
१- १ १/२ कप पाणी
मीठ चवीप्रमाणे
शालो फ्राय करण्यासाठी तेल
आणि १ मध्यम आकाराचा नॉन स्टिक तवा.

कृती:
१. तांदूळ आणि पोहे २-३ वेळा स्वच्छ धुवून तसेच भिजवत ठेवा.
२. १५-२० मिनिटांनी पोहे आणि तांदूळ एकत्र करून त्यात एक ते १ १/२ कप पाणी घाला. त्यातच कोथिंबीर, हिरव्या मिरच्या,मीठ आणि मेथी दाणे घालून बारीक वाटून घ्या.साधारण मध्यम जाडीचे मिश्रण तयार करा. गरज वाटल्यास आणखीन पाणी घाला.
३. चमचाभर तेल टाकून तवा गरम करा आणि डावभर मिश्रण घालून गोल पोळे काढा.  मिश्रण घातल्यावर त्याभोवती थोडेसे  तेल सोडा आणि वरून झाकण ठेवा.
४. २-३ मिनिटांनी झाकण काढून टाका खालची बाजून गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत झाली कि उलटा आणि दुसरी बाजू तेलावर गोल्डन ब्राऊन करून घ्या.
५.  गरम गरम पोळे टोमॅटो केचप किंवा कोथिंबिरीच्या  चटणी बरोबर सर्व्ह करा.

7 comments:

  1. sahi disat aahet...nakki try karun baghen....

    ReplyDelete
  2. thanks Megha :) ho nakki karun bagh..ani kase zale te pan kalav

    ReplyDelete
  3. chan vatatiye ga recipe ani nehamipeksha thodi vegali pan...mi pan try karin...asach same rava ani nachaniche pith nimme nimme gheun pan tyache dose kadhta yetat...mi kele ahet...masta lagtat.

    ReplyDelete
  4. thanks you Bhakti..ho mala nakki kalav..
    Nachni ani ravyache dose karun pahila pahijet..Idea mastta ahe.

    ReplyDelete
  5. wow me sudha udya lagech karun baghte...mazaya gharchya na nakki avadel .

    ReplyDelete
  6. me aaj kele khupach chan zale sarvana khup aawadle aani kase kele mhanun wicharle suddha

    ReplyDelete
  7. Thanks for the wonderful recipe.

    I Tried .... ani khupch chan zale pole..

    mala ek sangshil ka... batter non stick madhe kas takaych thick ki thin?

    Mi pole turn kartana te break hot hote.. pan taste was really good.

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!