फिश चटपटा- Tangy Fish Fry

Read this recipe in English 
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य :
१/२ kg .  सुरमई किंवा  तिलापीआ
१/४ टीस्पून ओवा
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
२ टेबलस्पून लिंबूरस
३ टेबलस्पून तांदळाचं पीठ
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
मीठ चवीप्रमाणे
४ टेबलस्पून तेल (शालो फ्राय करण्यासाठी)

कृती :
१. माशाचे २" x २" तुकडे करा.
२. माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट,  हळद, लिंबूरस, ओवा, मीठ लावून १ तास मॅरीनेट करून ठेवा.
३. मॅरीनेट केलेल्या माशाचे तुकडे तांदळाच्या पिठात घोळवा.  एका तव्यावर तेल गरम करा आणि तुकडे शालो फ्राय करून घ्या.लिंबू आणि मिठामुळे तुकड्यांना पाणी सुटेल त्यामुळे तांदळाचे पीठ चिकटून राहील आणि तुकडे चांगल्या प्रकारे फ्राय  करता येतील.
४. तुकडे ५ मिनिटा नंतर उलटे करा आणि दुसरी बाजू सुद्धा फ्राय करून घ्या.  गरज वाटल्यास थोडे तेल घाला. दोनही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचे तेल टिशू  पेपरनी  टिपून घ्या आणि ग्रीन मिंट चटणी बरोबर सर्व्ह करा.

टीप : अमेरिकेत ब-याचवेळा मासेखाऊ लोकांना भारतासारखे, हवे तसे मासे मिळत नाहीत त्यांच्यासाठी 'American  Tilapia'  किवा 'Catfish' हा मासा या डिश साठी उपयुक्त आहे.
  

1 comment:

  1. Tushar: Farach mast dish aahe. Me pahilyanada try keli aani far aavadali mala. He fish far testy aahe specially solkadi sobat. Far far Dhanyawad for this dish.

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!