रगडा पॅटीस-Ragda Patice

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य:
रगडा करण्यासाठी-
१ कप पांढरे वाटणे/ कबुली चणे
१ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी:-
१ १/२ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
पॅटीस  करण्यासाठी-
४-५ उकडलेले मध्यम बटाटे
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
१ कप बारीक शेव
१ कप बारीक चिरलेला कांदा
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

पूर्व तयारी- पांढरे वाटणे ८-९ तास पाण्यात भिजत घाला. नंतर भिजलेले वाटणे कुकरमध्ये पाणी घालून (जास्ती शिट्ट्या करून) मऊसर शिजवून घ्या. शिजवताना त्यात थोडे मीठ घाला.

कृती:
१. उकडलेल्या बटाट्याची साले काढून हाताने छान कुस्करून घ्या. त्यात मीठ घाला. १ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात हळद आणि हिंग  फोडणीला घाला. हे तेल कुस्करलेल्या बटाट्यात घालून हाताने मिक्स करा. मिश्रणाचे २" चे गोळे करा आणि हाताने किंचित दाबून चपटे करा. आता तुमचे पॅटीस शालो फ्राय करायला रेडी झाले :) तवा गरम करून तेलावर पॅटीस दोन्ही बाजूने छान ब्राऊन डाग पडे पर्यंत शालो फ्राय करून घ्या.
२. रगड्यासाठी  शिजवलेले वाटाणे डावाने घोटून घ्या. पाणी घालून थोडं पात्तळ करा. धने-जिरे पूड,हळद,तिखट आणि मीठ घालून ढवळा.
३. रगडा २-३ मिनिटे चांगला उकळत ठेवा. नंतर वरून मोहरी आणि हिंगाची  फोडणी द्या. झाकून ठेवा.
४. सर्व्ह करायच्या बशीत २ ते ३  पॅटीस ठेवा. त्यावर १/२ चमचा तिखट चटणी आणि १ -२ चमचे चिंचेची गोड चटणी घाला. त्यावर १ ते २  डाव गरम गरम रगडा  घाला. त्यावर कांदा आणि सर्वात वरती थोडी शेव घाला. वरती थोडी कोथिंबीर घालून खायला द्या.

3 comments:

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!