Showing posts with label Desserts/ पक्वान्न/ Sweet dish. Show all posts
Showing posts with label Desserts/ पक्वान्न/ Sweet dish. Show all posts

खरबुजाचे पोहे-Muskmelon Pohe

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी 

साहित्य:
१/२ कप खरबुजाचे तुकडे  
१ कप जाडे पोहे  
१/४ कप नारळाचे दुध
३/४ ते १  कप दुध
२ ते ३ टेबलस्पून किसलेला गुळ
१/४ टीस्पून वेलचीपूड

कृती:
१. पोहे पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. वरून पाण्याचे दोन हबके मारा आणि  १५-२० मिनिटे तसेच ठेवून द्या.
२. पोहे छान भिजले आणि फुगून आले  कि त्यात गार दुध, किसलेला गुळ आणि नारळाचं दुध आणि वेलची पूड घाला. गुळ वितळेपर्यंत ढवळा.
३. खरबुजाचे तुकडे घाला. तास-दोन तास फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.

टीप:
खरबूज जास्ती गोड असेल तर त्या प्रमाणे गुळाचे प्रमाण कमी जास्ती करा.
नारळाच्या दुधाच्या ऐवजी नारळ बारीक वाटून घातला तरी चालेल.
हे पोहे ताजे असतानाच खाल्ले तर जास्ती चांगले लागतात. उन्हाळ्यात खायला हे पोहे छान लागतात.

साबुदाण्याची खीर -Sabudana Kheer

सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
१/२ कप साबुदाणा
१/४ कप साखर
२ कप दुध
१ टेबलस्पून काजूचे तुकडे
१ टेबलस्पून बेदाणे
चिमुटभर केशर
१/४ टीस्पून वेलची पूड
१ टीस्पून तूप

कृती:
१. साबुदाणा २-३ वेळा स्वच्छ धुवून भिजवून ठेवा. जितका साबुदाणा तितकेच पाणी येईल अशा पद्धतीनी भिजवा. ४-५ तासांनी साबुदाणा फुगून  येईल.
२. १ कप दुध उकळत ठेवा. दुध उकळले कि त्यात साबुदाणा घाला. साबुदाणा अर्धवट शिजला असे वाटले कि, उरलेले दुध घाला. आणि साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत उकळत ठेवा. साबुदाणा तरंगायला लागला याचा अर्थ शिजला आहे.
३. मग त्यात साखर,वेलची पूड आणि केशर घाला. मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवत ठेवा.
४. दुसरीकडे एका छोट्या पातेलीत तूप गरम करा. त्यात काजू आणि बेदाणे गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग उरलेल्या तुपासकट खिरीत घालून ढवळून मग सर्व्ह करा.


श्रीखंड-Shrikhand

सर्व्हिंग: २ माणसे

साहित्य:
२०० ग्रॅम चक्का ( १ १/४ कप)
( घरगुती चक्का असा बनवा )
१/२ कप साखर
१/२ टीस्पून वेलचीपूड
२ टेबलस्पून कोमट दुध
चिमुटभर केशर
१ टीस्पून बदामाचे काप
१ टीस्पून पिस्त्याचे काप
कृती:
१. साखर आणि वेलची पूड एकत्र करून मिक्सरवर बारीक दळून घ्या. कोमट दुधात केशर खलून ठेवा.
२. दळलेली साखर आणि चक्का एकत्र करा. हँड मिक्सरनी दोन्ही एकजीव करून घ्या. साखरेमुळे श्रीखंडाला चकाकी येईल.हँड मिक्सर नसेल तर चमच्याने गोल गोल फिरवून छान एकजीव करून घ्या, म्हणजे साखर पूर्ण विरघळून जाईल.
३. नंतर मिश्रणात केशर घातलेले दुध,बदाम,पिस्त्याचे पात्तळ काप घालून मिक्स करा. श्रीखंड फ्रीज मध्ये ठेवा आणि पुरी बरोबर थंडगार सर्व्ह करा.

 टीप: चक्का जास्ती आंबट झाला तर साखरेचे प्रमाण वाढवा. 
याच पद्धतीने आंब्याचा रस घालून आम्रखंड करता येईल परंतु त्यात सुकामेवा आणि केशर न घालता फक्त आंब्याचा रस घाला.

दह्यापासून चक्का-How to Make Homemade Chakka

साधारण १ १/४ कप (२०० ग्रॅम) चक्क्यासाठी

साहित्य:
४ कप घट्ट दही
दीड फुट x दीड फुट सुती कापड
१ छोटे पातेले

कृती:
१. पातेल्यावर सुती कापड घाला आणि ४ कप मापानी घट्ट दही कापडावर घाला. कापडाची चारही टोकं धरून गाठ मारा. बोटांनी दही घट्ट आवळून घ्या.
२. कापडाची गाठ सैल वाटत असेल तर वरून दोरा गुंडाळून त्याची घट्ट गाठ मारा. कापडात बांधलेले दही रात्रभर टांगून ठेवा. ७-८ तासांनी दह्यातले सगळे पाणी गळून जाईल आणि घट्ट चक्का तयार होईल.
चक्क्याला किंचित आंबटपणा असला पाहिजे. आंबटपणा नसेल तर आणखीन १-२ तास चक्का तसाच टांगून ठेवा.

 टीप: चक्का बनवायला शक्यतो साईचे दही वापरू नका त्यामुळे श्रीखंडाचे टेक्चर स्मूथ होणार नाही. घरचे दही घट्ट नसेल तर रेडीमेड organic दही वापरून चक्का तयार करा

स्ट्रॉबेरी डीलाइट-Strawberry Delight

Servings : 4 Persons


साहित्य:
५०० ग्रॅम स्ट्रॉबेरी
२ १/२ कप फ्रेश क्रीम
१ १/२ कप whipped cream
१/४ कप साखर
१ पाकीट ब्रिटानिया लिटील हार्टस बिस्किटे 
कृती:
१. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून पाने काढून टाका.एका स्ट्रॉबेरीचे ४ तुकडे या प्रमाणे सगळ्या स्टॉबेरी चिरून घ्या. एका भांड्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि साखर मिक्स करून फ्रीजमध्ये ३ ते ४ तास  मुरवत ठेवा.
२. स्ट्रॉबेरी मध्ये साखर मुरून त्याला थोडे पाणी सुटेल. ब्रिटानिया लिटील हार्टस बिस्किटांचा चुरा करून घ्या.
३. फ्रेश क्रीममध्ये ४ टेबलस्पून साखर घाला आणि चमच्यानी किंवा हॅन्ड मिक्सरनी फेटून घ्या.
४. काचेचे ४ बाउल घ्या. त्यात सर्वात तळाला बिस्किटांचा थोडा चुरा घाला.त्यावर साखरेत मुरवलेली स्ट्रॉबेरी घाला.वरती फेटलेले क्रीम घाला.पुन्हा वरती बिस्किटांचा चुरा त्यावर स्ट्रॉबेरी घाला.
५. बाउल फ्रीज मध्ये ठेवा. serve  करायच्या वेळेस वरती whipped cream घाला आणि जेवणानंतर serve करा.

टीप: ब्रिटानिया लिटील हार्टस बिस्किटे नसतील तर कुठलीही गोड बिस्किटे वापरली तरी चालतील.

स्ट्रॉबेरी फिरनी-Strawberry Phirni

Servings : 3 to 4 Persons

साहित्य:
५ कप दुध
१/४ कप तांदूळ
२ टेबलस्पून बदामाचे कप
१/४ टीस्पून वेलची पूड
२-३ टेबलस्पून स्वीटंड कंडेन्स मिल्क
१ कप बारीक चिरलेली फ्रेश स्ट्रॉबेरी
३-४ थेंब स्टॉबेरी इसेन्स
साखर चवीप्रमाणे

कृती:
१. तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या. कुकरमध्ये अडीच पट पाणी घालून मऊसर भात करून घ्या.
२. पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची १" पातळी कमी होईल इतके आटवून घ्या. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध ब-यापैकी आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित ब्राऊन होईल. दुधावर साय येऊ देऊ नका.
३. तयार भात डावाने घोटून एकजीव करून घ्या. आटवलेल्या दुधात भाताची पेस्ट मिस्क करा. स्वीटंड कंडेन्स मिल्क घालून ढवळा आणि ४-५ मिनिटे उकळत ठेवा.
४. एकीकडे मिश्रण सतत ढवळत रहा. वेलची पूड आणि बदाम घालून ५-६ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून मिश्रण गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.
५. स्वीटंड कंडेन्स मिल्क आधीच खूप गोड असते त्यामुळे गरज वाटली तरच साखर घाला.स्ट्रॉबेरी इसेन्स घालून ढवळा.मिश्रण गार झालं कि त्यात बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी घालून ढवळा. मिश्रण गरम असताना स्ट्रॉबेरी घालू नका नाहीतर दुध आंबटपणामुळे दुध फाटण्याची शक्यता असते.
६. फ्रीज मध्ये ठेवा आणि वरून स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून थंड serve करा.

टीप: स्वीटंड कंडेन्स मिल्क नसेल तर दुध आटवून एकूण प्रमाणाच्या निम्मे करावे आणि चवीप्रमाणे साखर घालावी.

तांदळाची खीर- Rice Kheer

Servings : 2 to 3 Persons

साहित्य:
५ कप दुध
१/४ कप तांदूळ
२ टेबलस्पून बदामाचे कप
१ टेबलस्पून बेदाणे
चिमुटभर केशर
१/४ टीस्पून वेलची पूड
२-३ टेबलस्पून स्वीटंड कंडेन्स मिल्क
साखर चवीप्रमाणे

कृती:
१. तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या. कुकरमध्ये अडीच पट पाणी घालून मऊसर भात करून घ्या. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर घालून ठेवा.
२. पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची १" पातळी कमी होईल इतके आटवून घ्या. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध ब-यापैकी आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित ब्राऊन होईल. दुधावर साय येऊ देऊ नका.
३. तयार भात डावाने घोटून घ्या.आटवलेल्या दुधात भात मिस्क करा. स्वीटंड कंडेन्स मिल्क घालून ढवळा आणि ४-५ मिनिटे उकळत ठेवा.
४. बदाम आणि बेदाणे घाला.एकीकडे सतत ढवळत रहा. वेलची पूड आणि केशर घातलेले दुध घालून ५-६ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.
५. स्वीटंड कंडेन्स मिल्क आधीच खूप गोड असते त्यामुळे गरज वाटली तरच साखर घाला.खीर गार झाली कि फ्रीज मध्ये ठेवून थंड serve करा.

टीप: स्वीटंड कंडेन्स मिल्क नसेल तर दुध आटवून एकूण प्रमाणाच्या निम्मे करावे आणि चवीप्रमाणे साखर घालावी.

शेवयांची खीर- Vermicelli Kheer

Servings : 6 Persons 

साहित्य :
१ कप शेवया
७  कप दुध
४ टेबलस्पून स्वीटंड कंडेन्स  मिल्क
१ टीस्पून तूप
१/४ टीस्पून वेलची पूड
१ चिमुट केशर
१/४ कप बदामाचे कप
१/४ कप बेदाणे

कृती:
१. पातेल्यात तूप गरम करा आणि तुपावर शेवया गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्या. शेवया लांब असतील तर भाजताना चुरडून घ्या.(अंदाजे १/२"-१" लांबी ठेवा.)
२. दुस-या पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची १" पातळी कमी होईल इतके आटवून घ्या. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध  ब-यापैकी  आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित ब्राऊन होईल. दुधावर साय येऊ देऊ नका.
३. आटवलेले दुध भाजलेल्या शेवयांमध्ये घालून मिक्स करा. स्वीटंड कंडेन्स  मिल्क घालून ढवळा आणि खीर शेवया शिजे पर्यंत उकळत ठेवा.
४.बदाम आणि बेदाणे घाला.एकीकडे सतत ढवळत रहा. शेवया पूर्ण शिजल्यानंतर वेलची पूड आणि केशर घालून ५-६ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.
५.स्वीटंड कंडेन्स मिल्क आधीच खूप गोड असते त्यामुळे गरज वाटली तरच साखर घाला.खीर गार झाली कि फ्रीज मध्ये ठेवून थंड Serve करा.


टीप: स्वीटंड कंडेन्स मिल्क नसेल तर दुध आटवून एकूण प्रमाणाच्या निम्मे करावे आणि चवीप्रमाणे साखर घालावी.

मडगणं- Madgana

It is a very famous goan khir cooked with chana daal  and coconut milk.
Servings : 2 to 3 Persons

साहित्य :
१/२ कप चण्याची डाळ (हरबरा डाळ)
३ टेबलस्पून तांदूळ 
१ कप नारळाचं दुध
५ टेबलस्पून गूळ
५-६ काजू
१/४ टीस्पून वेलची पूड
३-४ बदामाची (सालं काढून) कापं

कृती :
१. कुकरमध्ये नेहमीपेक्षा जास्ती पाणी घालून तांदूळ शिजवा. कुकर थंड झाला कि शिजवलेले तांदूळ घोटून घ्या.
२. चण्याची डाळ बोटचेपी  वेगळी शिजवून घ्या. काजू बदाम कोमट पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा.
३. तांदूळ घोटले कि त्यात नारळाचं दुध, गूळ, वेलची पूड, काजू-बदामाची कापं घालून नीट मिक्स करा आणि शिजवलेली डाळ घालून १ उकळी काढा.
४. जेवताना किंवा जेवण झाल्यावर आवडी प्रमाणे गरम serve करा.

टीप : गुळाची गोडी कमी वाटल्यास १/२ चमचा साखर घाला.

गाजराचा हलवा- Gajar Ka Halwa


Simply Delicious !! Grated carrots cooked with milk, Mawa (khoa) and sugar.

सर्व्हिंग :
३ ते ४ माणसांसाठी

साहित्य :
४ कप गाजराचा कीस ( अंदाजे ४-५ मध्यम गाजरं)
४ टेबलस्पून साजूक तूप
१/२ कप साखर
१/२ टीस्पून वेलचीपूड
२ टेबलस्पून बेदाणे
२ टेबलस्पून बदामाची कापं
१ कप दुध
१/४ कप + १ टेबलस्पून किसलेला खवा

कृती :
१.नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करा. आणि त्यात गाजराचा कीस घालून १०-१५ मिनिटे परतून घ्या. परतून किसाचे प्रमाण थोडे कमी झालेले दिसेल आणि त्याला चकाकी येईल.
२. कीस चांगला शिजला आहे याची खात्री करून त्यात साखर घाला आणि चांगले एकत्र करा. ५-७ मिनिटे परता.
३. त्यात वेलची पूड, बेदाणे आणि बदाम घाला. दुध घालून दुध आटे पर्यंत परता.
४. २ टेबलस्पून कोमट दुधात केशर खलून ठेवा.
५. वेगळ्या भांड्यात खवा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्याला किंचित तूप सुटेल. खवा आणि केशरी दुध परतलेल्या गाजराच्या किसात मिक्स करा.
६. सगळा हलवा पुन्हा एकदा परतून घ्या. आणि गरम किंवा थंड आवडी प्रमाणे सर्व्ह करा
.