Servings : ६-७ वडे
३-४ उकडलेले बटाटे
२-३ लसूण पाकळ्या+ १/२" आलं +१ हिरवी मिरची - यांची पेस्ट
४-५ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हळद
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
लादी पाव
वड्याच्या कव्हरसाठी-
३/४ कप बेसन
१/२ कप ते ३/४ कप पाणी
१/४ टीस्पून हळदमीठ चवीप्रमाणे
३/४ कप बेसन
१/२ कप ते ३/४ कप पाणी
१/४ टीस्पून हळदमीठ चवीप्रमाणे
कृती:
१. उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. त्यात आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट,मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घाला.हाताने छान कालवून घ्या. चव बघून मीठ -मिरचीचे प्रमाण वाढवा.
२. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने, हळद आणि हिंग घालून कुस्करलेल्या बटाट्याला फोडणी द्या. हाताने, फोडणी पूर्ण सारणात मिक्स करा आणि त्याचे समान ६-७ (अंदाजे २ १/२"- ३" व्यासाचे) गोळे करा.
३. वड्याच्या कव्हर साठी- ३/४ कप बेसन घ्या. त्यात हळद,मीठ आणि बेताचे पाणी घालून एकजीव करा. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको.चमच्याने वरून खाली टाकून बघा. तार यायला पाहिजे. साधारण १/२ कप -३/४ कप पाणी घालून बघा. लागल्यास आणखीन पाणी घाला. बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
४. वडे तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या. तेल तापले कि बॅटरमध्ये सारणाचा गोळा बुडवून तेलात सोडा.वडे सोडायच्या आधी बोटाने बॅटरचा छोटा थेंब तेलात टाका. तो लगेच तळून आला कि तेल तापले आहे असे समजावे. वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
kharach ! pausaat hya dish cha majja veglach, ani to hi rajasthan madye. . .
ReplyDeleteMukul Acharya, kota Rajasthan...
Hi Mukul..Thanks for the comment.
ReplyDeletevadapav is best
ReplyDeleteghan ahe
ReplyDeletewav vada
ReplyDeletemala khup aawdto aani maza nawryrla pan mi banwte vada pan ha prakar jara vegla distoy mi ha pan prkar nakki karun pahin.
sonali
kharach aahe ! vada pav malahi khup khup avdto....... ani me hi recipe nakki majhya aaila karayla sangnar aahe.
ReplyDeletei made the same way except instead of pouring fodani on mashed potato I fried it for a little while. although it tastes equally good.your receipe is more mouth watering....
ReplyDeleteखरचं मस्त झाला वडा पाव.
ReplyDelete