सर्व्हिंग: ८-९ ठेपले
साहित्य:
१ कप गव्हाचं पीठ
२ टीस्पून बेसन
३ टेबलस्पून बाजरीचं / ज्वारीचं पीठ
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट / १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
२ टीस्पून तीळ
१/२ टीस्पून धनेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१ १/२ टीस्पून साखर
१ टीस्पून मीठ
२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
२ टीस्पून तेल (मोहन)
१ कप मेथीची पाने, चिरून
पीठ मळण्यासाठी दही (अंदाजे १/४ कप)
तांदळाची पिठी/ गव्हाचं पीठ लाटताना लावण्यासाठी
कृती:
१. परातीत गव्हाचं पीठ घ्या. त्यात बेसन, ज्वारी किंवा बाजरीचं पीठ घाला. मीठ,साखर आणि इतर मसाले घाला. तीळ,आलं-लसूण पेस्ट आणि २ चमचे तेल घालून हाताने एकत्र करा. बेसन आणि मोहन घातल्यामुळे ठेपले मस्त खुसखुशीत होतात.
२. मेथीची पाने घालून एकत्र करा नंतर चमचा चमचा दही घालत घट्ट पीठ मळून घ्या. तासभर पीठ झाकून ठेवा आणि मग लाटायला घ्या.
३. पीठाचे लिंबाच्या आकाराचे समान गोळे करा आणि तांदळाचं पीठ लावून ७"-८" व्यासाचे गोल ठेपले लाटा.
४. तवा गरम करा आणि ठेपले दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या. आवडत असेल तर भाजताना किंचित बटर किंवा तूप लावा.
५. गरम गरम ठेपले छुंदा किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
टीप: हे ठेपले डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवले तर १५-२० दिवस टिकतात.
बाजरी आणि ज्वारीचं पीठ दोन्ही असतील तर दोन्हीही पीठे थोडी थोडी घातली तरी चालतील.