Showing posts with label Soups / सार. Show all posts
Showing posts with label Soups / सार. Show all posts

व्हेज मंचाव सूप-Manchow soup

सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
३/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ कप बारीक चिरलेलं गाजर
१/२ कप पात्तळ उभा चिरलेला  कोबी
१  १/२ टेबलस्पून सोया सॉस (मी चिंग्झ सिक्रेटचा वापरते)
२ टीस्पून टोमॅटो केचप
१ टीस्पून चिली सॉस
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून अजिनोमोटो (MSG )
१/२" आलं, बारीक चिरून
३-४ मध्यम लसणीच्या पाकळ्या,बारीक चिरून
१ हिरवी मिरची,बारीक चिरून
१/२ टीस्पून मिरपूड
१ १/२ टेबलस्पून कॉर्न फ्लोर
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
२५ गरम नुडल्स  आणि त्या तळण्यासाठी तेल 

कृती:
१. नुडल्स पाण्यात घालून शिजे पर्यंत उकळत ठेवा. नंतर उकडून घेतलेल्या नुडल्स गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत तळून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा.त्यात बारीक चिरलेला आलं-लसूण आणि हिरवी मिरची घालून मोठ्या आचेवर मिनिटभर परता. बारीक चिरलेली कांद्याची पात घालून २ मिनिटे परता.
३. १/२ टेबलस्पून सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, मिरपूड,विनेगर,साखर आणि मीठ घालून मोठ्या आचेवर परता.
४. लगेचच बारीक चिरलेला गाजर ,कोबी आणि अजिनोमोटो घालून परता.
५. कॉर्न फ्लोर आणि १ टेबलस्पून सोया सॉस व्हेजिटेबल स्टॉक मध्ये गुठळ्या होऊ न देता मिक्स करा.
६. हे सगळे मिश्रण परतलेल्या भाज्यांमध्ये घाला. मीठ घालून सूप जाडसर होई पर्यंत उकळा.
७. वरून तळलेल्या नुडल्स आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून सजवा आणि गरम गरम सर्व्ह करा.

आमसुलाचे सार-Amsulache saar

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
१  १/२ कप पाणी
६-७ आमसुलं  
१ हिरवी मिरची  
१ टेबलस्पून किसलेला गुळ
२ टेबलस्पून खवलेलं ओलं खोबरं
१ टीस्पून तांदळाची पिठी
१ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 
मीठ चवीप्रमाणे

कृती:
१. एक कप पाण्यात आमसुलं घालून उकळी काढा. त्यात गुळ घाला.
२. ओलं खोबरं आणि हिरवी मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
३. आमसुलाच्या पाण्यात वाटलेलं खोबरं घाला. मीठ घालून ५ मिनिटे उकळत ठेवा.
४. २ टेबलस्पून पाण्यात तांदळाची पिठी छान मिक्स करा आणि उकळत्या सारामध्ये  घालून सार ५-७ मिनिटे उकळवा. कोथिंबीर बारीक चिरून घाला. अर्ध्या तासांनी आमसुलं काढून टाका आणि सर्व्ह करा.

कैरीचे सार-Raw Mango Soup

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
१ मध्यम कैरी
१/२ कप किसलेला गुळ
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी-
१ १/२ टेबलस्पून तेल
२ सुक्या मिरच्या
१/४ टीस्पून मेथीदाणे
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग

कृती:
१. कुकरमध्ये थोडे पाणी घालून कैरी उकडून घ्या. कुकर थंड झाला कि, कैरीची साले काढून टाका.
२. कैरीचा गर काढू घ्या. कैरीची सालं पाण्यात घालून २-३ वेळा पिळून घ्या म्हणजे त्याला लागलेला गर सुद्धा निघून घेईल. कैरीचा गर आणि सालं पिळलेले पाणी मिक्सरमध्ये काढून प्युरी तयार करा.
३. प्युरी खूप जाडसर असेल तर पाणी घालून थोडा पात्तळ करून घ्या. सार हे ब-यापैकी पात्तळ असते.
४. त्यात मीठ आणि गुळ घालून ढवळा आणि गुळ पूर्ण वितळेपर्यंत उकळत ठेवा.
५. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, जिरे आणि मेथीदाणे घाला. मिरच्या २ तुकडे करून घाला. मिरची छान तळून आली कि हिंग घालून लगेच साराला फोडणी द्या. ५-७ मिनिटे झाकून ठेवा आणि मग सर्व्ह करा.

क्रीम ऑफ स्वीटकॉर्न सूप-Cream of Sweetcorn Soup

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३  माणसांसाठी
साहित्य :
२ कप मक्याचे दाणे
३-४ लसूण पाकळ्या
१/२ टीस्पून मिरेपूड
१/४ कप फ्रेश क्रीम
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१/४ टीस्पून पार्सले
१/४ टीस्पून ओरिगॅनो

कृती :
१. मक्याचे दाणे १/४ कप पाणी घालून वाफवून घ्या. त्यातले १ कप दाणे मिक्सरमध्ये १ कप पाणी घालून बारीक वाटून घ्या.क्रीम चांगले फेटून ठेवा.
२. पातेल्यात बटर घालून गरम करा आणि त्याच्यात लसूण चिरून घाला.
३. मिरेपूड घालून मग १ कप मक्याचे दाणे घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
४. मिक्सरवर वाटलेले दाणे घाला. १ कप पाणी घालून उकळा.मीठ साखर घालून ढवळा.
५. सूप ५-१० मिनिटे चांगले उकळू दे.गॅस बंद करून त्यात क्रीम घाला वरून पार्सले आणि ओरिगॅनो घालून गरम सर्व्ह करा.




टोमॅटो सूप-Tomato Soup

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३  माणसांसाठी 

साहित्य :
३ टोमॅटो
३-४ लसूण पाकळ्या
१/२ टीस्पून मिरेपूड
१ टेबलस्पून लोणी
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
ब्रेड क्रम्स करण्यासाठी-
ब्रेडचा १ स्लाइस
३ टेबलस्पून तेल
चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड,१/२ टीस्पून पार्सले

कृती :

१. प्रथम टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून घ्या.
२. पातेल्यात बटर घालून गरम करा आणि त्याच्यात लसूण ठेचून घाला.
३. मिरेपूड घालून मग टोमॅटो-प्युरी घाला.
४. २ १/२ कप पाणी घाला मीठ साखर घालून ढवळा.
५. सूप ५-१० मिनिटे चांगले उकळू दे. ब्रेड क्रम्स घालून गरम सर्व्ह करा.
६. ब्रेडच्या स्लाइसचे कात्रीने चौकोनी छोटे तुकडे करा.
७. कढईत तेल गरम करा आणि ब्रेडचे तुकडे घालून परता. वरून १ चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड,१/२ टीस्पून ड्राय पार्सले घाला.
८. मंद आचेवर तुकडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. गरम सुपात सर्व्ह करायच्या वेळी वरून ब्रेड क्रम्स घाला.

टीप: ब्रेड क्रम्स जास्ती करून ठेवले तर एअर टाइट बरणीत भरून ठेवा म्हणजे मऊ पडणार नाहीत. 

तिवळ-Tiwal-kokmache Saar

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३  माणसांसाठी 


साहित्य: 
२ कप पाणी
४-५ सोलं (आमसुलं )
१ हिरवी मिरची उभी चिरून
१ चिमुट हिंग
३ टीस्पून साखर
१/२ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती: 
१. १ तास सोलं कोमट पाण्यात घालून ठेवा. म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल.
२. २ कप पाण्यात अर्क उतरेलं पाणी, हिरवी मिरची, कोथिंबीर,१ चिमुट हिंग घाला.
३. मीठ साखर घालून ढवळून घ्या. साखर पूर्ण विरघळली पाहिजे.
४. गरम वरण भातावर तिवळ वाढावे किंवा तिवळ पाचक असते त्यामुळे जेवणानंतर प्यायला द्यावे.

टीप : तिवळ आणि ताक मिक्स करून सुद्धा पिता येते.ताकामुळे त्याला वेगळाच स्वाद येतो. 

पालकाचं सूप-Cream of Spinach Soup

'Green, Healthy and Tasty Spinach soup' 
Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३  माणसांसाठी 

साहित्य: 
१ जुडी पालक
३/४ कप दुध
१ टेबलस्पून क्रीम
१/४ टीस्पून मिरपूड
मीठ आणि साखर चवीप्रमाणे

कृती:
१. पालकाची पाने खुडून स्वच्छ धुवून घ्या. पातेल्यात १ कप पाणी उकळत ठेवा. उकळत्या पाण्यात धुतलेली पाने टाका.
२. ३-४ मिनिटे तसेच उकळत ठेवा. पालक पूर्ण वाफवला गेला कि, मिक्सरमधून पाण्यासकट काढून त्याची प्युरी करा.
३. प्युरीत अजून १ कप पाणी मीठ साखर आणि मिरपूड घालून उकळी काढा.
४. पालकाला उकळी आल्यावर त्यात उकळतं दुध घाला.सूप नंतर सर्व्ह करायचं असेल तर सर्व्ह करायच्या वेळेस दुध घाला.
५. सर्व्ह करताना वरून क्रीम घाला.

व्हेजिटेबल क्लिअर सूप- Veg Clear Soup


Read this recipe in English 
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
साहित्य :
६ कप व्हेजिटेबल स्टॉक
( रेसिपी साठी क्लिक करा)
१/२ कप बारीक चिरलेलं गाजर
१/२ कप बारीक चिरलेलं फ्लॉवर
१/२ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची बारीक चिरून
१/२ टीस्पून मिरपूड
२ टीस्पून बारीक चिरलेलं आलं
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१ चिमुट अजिनोमोटो (optional)
१ टेबलस्पून तेल/ बटर

कृती :
१. एका पातेल्यात १ टेबलस्पून तेल गरम करा. आणि त्यात गाजर आणि फ्लॉवर घालून २-३ मिनिटे परता नंतर आलं आणि हिरवी मिरची(मिरचीच्या आतल्या बिया पूर्ण काढून) घालून परता.भाज्या अर्धवट शिजल्या कि,वरून व्हेजिटेबल स्टॉक आणि कोथिंबीर घालून उकळी काढा.
२. नंतर सुपात मीठ, साखर, मिरपूड आणि अजिनोमोटो घालून ढवळा.
३.सर्वात शेवटी कांद्याची पात घालून एक उकळी काढा आणि मग सर्व्ह करा.

स्वीटकॉर्न सूप-Vegetable Sweetcorn Soup

Read this recipe in English
सर्व्हिंग: ६  माणसांसाठी 

साहित्य :
४०० ग्रॅम स्वीटकॉर्न क्रीम स्टाईल
८ कप व्हेजिटेबल स्टॉक ( रेसिपी साठी क्लिक करा )
१ १/२ कप मक्याचे दाणे
१/२ कप बारीक चिरलेलं गाजर
१ /२ कप बारीक चिरलेलं कोबी
१/२ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१/२ टीस्पून मिरपूड
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१ चिमुट अजिनोमोटो

कृती :
१. व्हेजिटेबल स्टॉक मध्ये स्वीटकॉर्न क्रीम स्टाईल घालून मिक्स करा आणि मक्याचे दाणे घालून उकळा.
२. नंतर सुपात ५-७ मिनिटांनी गाजर आणि कोबी घालून उकळा. मीठ, साखर, मिरपूड आणि अजिनोमोटो घालून ढवळा.
३.सर्वात शेवटी कांद्याची पात घालून एक उकळी काढा आणि मग सर्व्ह करा.

टीप: सुपाला जाडसरपणा हवा असेल तर १ टीस्पून कॉर्नफ्लोर १/२ कप पाण्यात मिक्स करून सुपात घाला आणि सुपाला जाडसरपणा येई पर्यंत उकळा.



दुधी भोपळ्याचे सूप-Bottle Gourd Soup

 'Healthy and Tasty'
Read this recipe in English

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य :
६" लांब दुधीचा तुकडा
२ लसूण पाकळ्या
कांद्याचा छोटा (अंदाजे ३") तुकडा
१/४ टीस्पून मिरपूड
१ चिमुट अजिनोमोटो (MSG )

कृती :
१. दुधीची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करा. कुकरमध्ये दुधीच्या फोडी, कांदा, लसूण १ कप पाणी घालून शिजवून घ्या.
२. शिजलेला दुधी,कांदा,लसूण मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
३.वाटणात २ कप पाणी ,मिरपूड, अजिनोमोटो आणि मीठ घालून उकळी काढा. आणि सर्व्ह करा.

कुळथाचे कढण -Horsegram Soup

Healthy and  Tasty  Maharashtrian  Soup
Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 
साहित्य :
१ कप कुळीथ
५  कप पाणी
१/२ कप गोड दह्याचे ताक
१ चमचा साखर
चिमुटभर लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल

कृती :
१. कुळीथ ८-१० तास भिजवून ठेवा. भिजवलेले कुळीथ चाळणीत झाकून उबदार जागी ठेवा. म्हणजे त्याला  मोड येतील.
२. मोड आलेले कुळीथ कुकरमध्ये ५-६ कप पाणी घालून ४-५ शिट्ट्या काढून मऊसर शिजवून घ्या.
३. कढणासाठी  वरचे पाणी ओतून घ्या. कुळीथ नंतर उसळीसाठी ठेऊन द्या.
४. कुळथाच्या पाण्यात मीठ, साखर, चिमुटभर लाल तिखट, कोथिंबीर घालून उकळा. उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि मग २-३ मिनिटांनी ताक घाला.
५. फोडणीच्या कढईत  तेल गरम करून आधी जिरे मग हिरव्या  मिरचीचे तुकडे घाला. मिरची पांढरी झाली कि मग कढीपत्ता आणि हिंग घालून कढणाला  वरून फोडणी द्या.

टीप : कुळथाचे कढण अतिशय पौष्टिक असते. आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी किंवा लहान मुलांना थंडी पावसाळ्यात द्यावे.
कुळथाच्या ऐवजी चवळी किंवा  मुग याचे सुद्धा अश्याच पद्धतीने कढण करता येते.

टोमॅटो शोरबा- Tomato Shorba

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य :
३ टोमॅटो
३ टीस्पून ओलं खोबरं
१/२ कप नारळाचं दुध
१/४ टीस्पून जिरे
१ १/४  टीस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून लोणी/ sweetend butter
चिमुटभर मिरेपूड
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
1 टेबलस्पून कोथिंबीर
४-५  पुदिन्याची पाने (mint leaves)

कृती :
१. प्रथम टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून घ्या.
२. पातेल्यात बटर घालून गरम करा आणि त्याच्यात जिरे घाला. खमंग वास सुटला कि ओलं खोबरं आणि नारळाचा दुध घाला.लाल तिखट मिरेपूड घालून एक उकळी काढा.
३. मग टोमॅटो-प्युरी घाला. पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर बारीक चिरून घाला.
४. २ १/२ कप पाणी घाला मीठ साखर घालून ढवळा.
५. सूप ५-१० मिनिटे चांगले उकळू दे. जरा वेळानी गॅस बंद करा आणि गरम सर्व्ह करा.