Showing posts with label Salads/ कोशिंबीर/ Raitas. Show all posts
Showing posts with label Salads/ कोशिंबीर/ Raitas. Show all posts

बुंदी रायता- Boondi Raita

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य:
१ कप घट्ट दही
३/४ कप तिखट बुंदी
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१/२ टीस्पून चाट मसाला
१/८ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून भाजून कुटलेलं जिरं
१ टीस्पून चिरलेली कोथिंबीर 

कृती:
१. दही छान फेटून घ्या. त्यात मीठ,साखर,कुटलेलं जिरं,लाल तिखट आणि चाट मसाला घालून एकत्र करा.
२. कोथिंबीर आणि बुंदी घालून छान मिक्स करा आणि सर्व्ह करा.

कायरस/मेथांबा-Kairas (Raw Mango Raita)

Kairas is a tangy recipe made with Raw mango. In maharashtra many people know this dish by Methamba. In Kerala people call it Mango Pachadi.

सर्व्हिंग:  २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
१ मध्यम कैरी 
१/२ कप किसलेला गुळ
१ टीस्पून लाल तिखट
३ टेबलस्पून सुकं खोबरं
२ टीस्पून उडदाची डाळ
फोडणीसाठी-
१ १/२ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हिंग
१ टीस्पून मेथीदाणे
४-५ कढीपत्ता पाने
मीठ चवीप्रमाणे 

कृती:
१. कैरीची साले काढून मध्यम फोडी करा. सुकं खोबरं आणि उडदाची डाळ ब्राऊन होई पर्यंत खमंग भाजून मिक्सरवर (पाणी न  घालता) बारीक वाटून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा. तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, मेथीदाणे आणि कढीपत्ता पाने घाला. फोडणीचा छान वास सुटला कि लगेच हिंग घालून कैरीच्या फोडी घाला.
३. तिखट आणि मीठ घालून परतून घ्या. १/४ कप पाणी घालून ढवळा. झाकण ठेवून कैरीच्या फोडी ५-१० मिनिटे शिजवत ठेवा.
४. कैरी व्यवस्थित शिजली कि गुळ घाला. गुळ वितळेपर्यंत उकळत ठेवा. गरज वाटल्यास आणखीन थोडेसे पाणी घाला. आवडीप्रमाणे कायरस जाड पात्तळ केला तरी चालेल.
५. गुळ वितळला कि, त्यात सुकं खोबरं आणि उडदाच्या डाळीची पावडर घालून मिक्स करा. १ उकळी काढा. कायरस थंड झाला कि मग सर्व्ह करा.

टीप: 
फ्रिझमध्ये डब्यात बंद करून ठेवला तर, कायरस २ ते ३ आठवडे सहज टिकतो .
कैरीच्या आंबटपणा नुसार गुळाचे प्रमाण वाढवावे.

बीटाची कोशिंबीर-Beetroot Salad

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी

साहित्य:
१ मध्यम आकाराचे बीट
३ टीस्पून दाण्याचा कुट
१ टेबलस्पून लिंबू रस
१ छोटा टोमॅटो
१-२ हिरव्या मिरच्या
४-५ कढीपत्ता पाने
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तेल

कृती:
१. बीटाची साले काढून बीट कच्चे किसून घ्या. त्यात टोमॅटो बारीक चिरून घाला.
२. मीठ,साखर,लिंबुरस,दाण्याचा कुट घालून हाताने मिक्स करून घ्या. 
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा तेल कडकडीत तापले कि जिरे घाला मग हिरव्या मिरचीचे तुकडे घाला.मिरची पांढरी झाली कि कढीपत्ता पाने आणि हिंग घालून कोशिंबिरीला वरून फोडणी द्या.

खमंग काकडी-Kakdichi Koshimbir

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी 



साहित्य: 
१ मध्यम काकडी
१/२ कप दही
२ टेबलस्पून दाण्याचा कुट
मीठ, साखर चवीप्रमाणे
१-२ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
२ टेबलस्पून तूप

कृती: 
१. काकडी कोचून किंवा बारीक चिरून घ्या.
२. दह्यामध्ये कोचलेली काकडी,दाण्याचा कुट,मीठ आणि साखर घालून मिक्स करा.
३. फोडणीच्या कढईत तूप गरम करा. तूप कडकडीत तापले कि, जिरे फोडणीला घाला.
४.जि-याचा खमंग वास आला कि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. मिरची पांढरी झाली कि हिंग घालून कोशिंबिरीला फोडणी द्या.

केळ्याचं रायतं-Banana Raita

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी

साहित्य:
१ मोठं केळं
४ टेबलस्पून दही
२ टेबलस्पून खवलेलं ओलं खोबरं
१ हिरवी मिरची
१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
मीठ आणि साखर चवीप्रमाणे

कृती:
१. एका बाउल मध्ये केळं कुस्करून घ्या. त्यात दही,मीठ साखर घालून चमच्याने घोटून घ्या.
२. मिश्रणात ओलं खोबरं आणि हिरवी मिरची बिया काढून आणि उभी चिरून घाला.कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

पेअर सॅलड -Pear Salad with Walnut

Read this recipe in English
सर्व्हिंग:४ माणसांसाठी



साहित्य:
२ पिकलेले पेअर
१ कप सोअर क्रीम
१ चिमुट मीठ
१/२ टीस्पून साखर
१/४ टीस्पून मिरपूड
५-६ अक्रोड

कृती:
१. सोअर क्रीममध्ये मीठ, साखर ,मिरपूड घालून ते फेटून घ्या.
२.त्यात अक्रोडचे तुकडे आणि  पेअरच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घाला.
३.सॅलड नीट मिक्स करून वरून मिरपूड आणि अक्रोड घालून सजवा. फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार असताना सर्व्ह करा.

कोबीची पचडी-Cabbage salad

Read this recipe in English
सर्व्हिंग : ४ माणसांसाठी

साहित्य:
४ कप उभा चिरलेला कोबी
१ टेबलस्पून लिंबूरस
१ १/२ टीस्पून साखर  
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
२ सुक्या लाल मिरच्या
५-६ कढीपत्ता पाने
१ टेबलस्पून तेल

कृती:
१. कोबी उभा आणि पात्तळ चिरून घ्या. कोबी ताजा आणि करकरीत असावा.
२. कोबीला मीठ, साखर आणि लिंबूरस लावून हाताने  चोळून घ्या.
३. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि सुक्या मिरच्या २ तुकडे करून घाला. नंतर कढीपत्ता पाने आणि हिंग घालून कोशिंबिरीला वरून फोडणी द्या.

मुग आणि छोले सॅलड -Mung and chole salad

Chatpata quick and easy salad.
Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी 

साहित्य :
१ कप भिजवलेले छोले
१ १/२  कप मोड आलेले मुग
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ छोटा उकडलेला बटाटा
१ टीस्पून चाट मसाला
१/४ टीस्पून लाल तिखट
१ चिमुट गरम मसाला  
मीठ आणि साखर चवीप्रमाणे

कृती:
१. उकडलेल्या बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.त्यांना २ चिमुट चाट मसाला,गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ लावून ठेवा.
२.कुकरमधून थोडे पाणी आणि मीठ घालून छोले शिजवून घ्या. छोले खूप मऊ शिजू देऊ नका.शिजवलेले छोले (थंड झाल्यावर)
 कांदा आणि मुग एकत्र करून त्यांना चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ लावून घ्या.त्यात बटाट्याच्या फोडी मिक्स करा आणि सर्व्ह करा.

टोमॅटोचं पंचामृत-Tomato Raita

'A red Spicy Tomato Raita'
Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी


साहित्य :
२ मध्यम टोमॅटो
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
३-४ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून मेथीदाणे
१/२ टीस्पून लाल तिखट
४ टीस्पून किसलेला गुळ
२ टेबलस्पून  भाजलेलं सुकं खोबरं
मीठ चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तेल

कृती:
१. टोमॅटो बारीक चिरून घ्या.
२. एका पातेल्यात तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता पाने आणि मेथीदाणे घाला. मेथी लालसर झाली कि हिंग घालून वरून बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता.
३. लाल तिखट आणि गुळ घालून चांगले उकळा. मीठ घाला आणि चव बघा. खूप आंबट असेल तर अजून थोडा गुळ घाला. भाजलेलं सुकं खोबरं चुरडून घाला.

पायनॅपल रायतं-Pineapple Raita

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य :
१ १/२ कप ताज्या अननसाच्या फोडी
२-३ चेरीचे तुकडे
२ कप दही
३ टीस्पून साखर

कृती :
१. पातेल्यात अननसाच्या फोडींना १ टीस्पून साखर लावून  ५ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. मायक्रोवेव ओव्हन असेल तर त्यात १ मिनिट ठेवून शिजवाव्यात.
२. बाउल  मध्ये दही घोटून घ्या. त्यात २ टीस्पून साखर आणि चेरीचे तुकडे घाला. साखर विरघळेपर्यंत मिक्स करा.
३. शिजवलेल्या अननसाच्या फोडी थंड झाल्यावर घाला. गरम फोडी घातल्या तर दही आंबट आणि पात्तळ होण्याची शक्यता असते. रायतं फ्रीज मध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.

व्हेज रायतं -Veg Raita





सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य :
१  काकडी
१ टोमॅटो 
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ कप दही
२  टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
१/२ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून भाजलेले जिरे कुटून/चुरडून 
१ हिरवी मिरची बारीक चिरून

कृती :
१. काकडी टोमॅटो  बारीक चिरून घ्या. चिरलेला कांदा, काकडी आणि टोमॅटो  एकत्र करून त्यात दही ,मीठ, साखर चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
२. हिरवी मिरची घाला आणि चव घेऊन बघा. भाजून चुरडलेले जिरे घालून सर्व्ह करा.

लाल-मुळ्याची कोशिंबीर- Red Radish Salad


सर्व्हिंग: २ ते ३  माणसांसाठी

साहित्य :
५-६ लाल मुळे
३/४ कप दही 
१ १/२ टीस्पून साखर
१/४ + १ चिमुट मीठ  
१/४ टीस्पून मोहरी
३-४ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून हिंग
१ सुकी लाल मिरची
१ टेबलस्पून तेल

कृती :
१. मुळा किसून घ्या. त्यात दही ,मीठ, साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
२.कढईत  तेल गरम करा आणि मोहरी घाला.मोहरी तडतडली कि लाल मिरची, कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घाला. 

टीप:  पांढ-या मुळ्याची सुद्धा याच पद्धतीने कोशिंबीर करता येते  परंतु तो थोडा उग्र असतो त्यामुळे ब-याच  जणांना आवडत नाही. पांढ-या  मुळ्याची कोशिंबीर केली कि त्यात भिजवलेली मुगाची डाळ घालावी.

दही भेंडी- Bindi Raita

A delightful raita of fried Okra in spiced yogurt 
Read this recipe in English 
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी


साहित्य :
१०० ग्रॅम भेंडी (अंदाजे २० - २५ भेंडी)   
१ कप दही
१/४ टीस्पून चाट मसाला
३/४  टीस्पून साखर
१/४ टीस्पून मीठ
१-२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल
भेंडी तळण्यासाठी तेल

कृती :
१. भेंडी धुवून कापडाने कोरडी करून घ्या.मग त्याचे १/२" लांबीचे तुकडे करा.
२. कढईत तेल गरम करा आणि भेंडी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या.
३. बाउल मध्ये दही घोटून घ्या. त्यात मीठ,साखर चाट मसाला घालून नीट ढवळून घ्या.
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि मोहरी घाला.
मोहरी तडतडली कि हिरवी मिरची कढीपत्ता आणि हिंग घालून दह्याला फोडणी द्या.
५. सर्व्ह करायच्या वेळेस, तळलेली भेंडी दह्यात घालून मिक्स करा.

गाजराचा रायतं- Carrot Raita

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी



साहित्य :
१ १/२ कप गाजराचा किस
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१ कप फेटलेले दही
१ टेबलस्पून दाण्याचा कुट
१/२ टीस्पून साखर
१/४ टीस्पून चाट मसाला
मीठ चवी प्रमाणे
थोडी कोथिंबीर सजावटी साठी

कृती :
१. प्रथम दह्यात दाण्याचा कुट, चाट मसाला, मीठ, साखर घालून नीट मिक्स करून घ्या.
२. नंतर टोमॅटो आणि गाजराचा किस घालून सगळं व्यवस्थित मिक्स करा.
3. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

गाजराची कोशिंबीर- Carrot Salad

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३  माणसांसाठी


साहित्य :
२ कप गाजराचा कीस
१ टीस्पून लिंबू रस
१ १/४ टीस्पून साखर
२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी - १ टेबलस्पून तेल, १/४ टीस्पून मोहरी , १/४ टीस्पून हिंग ,५-६ कढीपत्ता पाने, १ हिरवी मिरची

कृती :
१. गाजराच्या किसाला मीठ ,साखर लावून घ्या. लिंबाचा रस घालून मिक्स करा.
२. फोडणीच्या कढईत तेल तापवून आधी मोहरी घाला. मोहरी तडतडली कि हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घाला. शेवटी हिंग घालून कोशिंबीरीला फोडणी द्या.

टीप : फोडणी दिल्यावर लगेच कोशिंबीर झाकून ठेवा म्हणजे कोशिंबीरीला फोडणीचा छान स्वाद येतो.